Facebook

virat kohli left indian cricket captancy | विराट कोहली कर्णधार पद सोडणार .

विराट कोहलीने आज आपल्या twitter अकाउंट द्वारे आपले कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला . विराट कोहली गेली काही वर्ष धावा करण्यात अपयशी ठरला आहे . त्याचा मागील काही सामने पहिले तर त्याचे शतक २०१९ वर्षी बांगलादेश च्या विरुद्ध आले होते त्याचा परफॉर्मन्स दिवषेंदिवस उतरत जात होता . कर्णधार पदाचा जबाबदारीमुळे त्याच्या खेळावर परिणाम होत नाही हा प्रश्न उध्दभवत होता त्याचा आज विराट कोहली ने निकाल लावला . 

विराट कोहली ने कर्णधार पद रोहित शर्मा कडे सोपवनार अश्या बातम्या गेल्या काही दिवसापासून चर्चेत होत्या त्या अखेर खरी ठरली आहे . आणि आज भारताचा कर्णधार विराट कोहली ने इंडियन T२० चे कर्णधार पद आगामी जागतिक T२० स्पर्धेनंतर सोडण्याचा निर्णय घेतला आहे . येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या t२० स्पर्धेनंतर विराट कोहली भारतीय t२० संघाचे कर्णधार पद सोडणार आहे 

विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा :

विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा अशी चर्चा तर खूप वेळा होत असते . विराट कोहली कसोटी क्रिकेट मध्ये दमदार आहे तर त्याचा t२० आणि odi क्रिकेट मध्ये अपयशी ठरत आहे तरी कमी ओव्हर च्या खेळाचे कर्णधार पद बदलण्यावर खूप वेळा चच्या होत होती त्यात रोहित शर्मा ने T२० ipl मध्ये कर्णधार पदासोबत पाच ipl cup जिंकले आहेत . आणि विराट कोहली ने एकही नाही तसेच त्याने कोणताही icc इव्हेंट जिंकला नाही जर विराट आणि रोहित यांच्यामध्ये लिमिटेड ओव्हर खेळ पाहता रोहित शर्मा चे पारडे जाड आहे तसेच रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार पण आहे . तरी BCCI ने अद्याप काही नवीन कर्णधारयाचे नाव कळवले नाही त्यामुळे रोहित शर्मा कि इतर दुसरा कोणी बाजी मारतो ते पाहणे चुरशीची आहे . 

विराट कोहली काय म्हणाला :गेल्या ८-९ वर्षापासून मी तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. गेल्या ५-६ वर्षापासून मी नियमीतपणे कर्णधार म्हणून काम पाहत आहे. माझा वर्कलोड लक्षात घेता. भारतीय संघासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये योगदान देण्याच्या दृष्टीने मी हा निर्णय घेत असल्याचे विराटने म्हटले आहे. या संदर्भात मी जवळच्या व्यक्ती, रवी शास्त्री, बीसीसीआयचे सचिव जय शहा, अध्यक्ष सौरव गांगुली, निवड समिती आणि रोहित शर्मा यांच्या सोबत चर्चा करून हा निर्णय घेतलाय. भारतीय संघासोबत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा यापुढे देखील मी प्रयत्न करेन.



कर्णधार म्हणून विराटची कामगिरी
वनडे

सामने- ९५ 

विजय-६५
पराभव-२७
टाय-१
निकाल नाही- १
टक्केवारी- ७०.४३
---


टी-२०
सामने- ४५
विजय-२९
पराभव-१४
टाय-०
निकाल नाही- २
टक्केवारी- ६७.४४
---
आयपीएल

सामने-१३२
विजय-६२
पराभव-६६
टाय-०
निकाल नाही- ४
टक्केवारी- ४८.४३

और नया पुराने